Ad will apear here
Next
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

काँग्रेस पक्षाने बुधवारी आपली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये सुनील तटकरे (रायगड), सुप्रिया सुळे (बारामती), उदयनराजे भोसले (सातारा), धनंजय महाडिक (कोल्हापूर), राजेंद्र शिंगणे (बुलढाणा), गुलाबराव देवकर (जळगाव), राजेश वीटेकर (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व), आनंद परांजपे (ठाणे), बाबाजी पाटील (कल्याण), मोहम्मद फैजल (लक्षद्वीप) आणि हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठींबा दिला आहे.



‘उर्वरित उमेदवारांची यादी उद्या आणि परवा जाहीर करण्यात येईल. बीड, अहमदनगर उमेदवारांबाबत चर्चा झाली आहे. लवकरच हीसुद्धा नावे जाहीर केली जातील. गडाख यांची उमेदवारी जाहीर करून काम केले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांचा पराभव केला होता. ही जुनी घटना पवार साहेबांनी सांगितली. त्यामुळे पवारसाहेबांनी कुणाचा अपमान केलेला नाही,’ असे पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZRRBY
Similar Posts
‘राष्ट्रवादी’च्या जाहीरनामा समिती अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील मुंबई : ‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली असून, या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली आहे,’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.
‘राष्ट्रवादी’तर्फे लोकसभेचे आणखी पाच उमेदवार जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली १२ उमेदवारांची यादी १४ मार्च २०१९ रोजी यादी जाहीर केल्यानंतर १५ मार्चला आणखी पाच उमेवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’
‘राष्ट्रवादी’चे ४० स्टार प्रचारक जाहीर मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language